महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेत सरकार महिलांना दर महिन्याला पैसे देतं. आठवा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये 7 मार्च रोजी महिलांच्या बँक खात्यात जमा झाले. हे पैसे सरकारने महिला दिनाच्या आधी दिले.
पण अनेक महिलांना प्रश्न होता की, मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार?
9वा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचे पैसे
आता सरकारने सांगितले आहे की, मार्च महिन्याचे 1500 रुपयेही लवकरच मिळणार आहेत. 12 मार्चच्या आत हे पैसे महिलांच्या बँक खात्यात टाकले जातील. हे पैसे थेट बँकेत जातील, कोणालाही कुठे जावे लागणार नाही.
एकूण 2 कोटी 41 लाख महिलांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. यामध्ये विवाहित महिला, विधवा महिला, घटस्फोटित महिला, परित्यक्त महिला आणि कुटुंबातील एक अविवाहित महिला यांचा समावेश आहे.
या महिलांना पैसे कसे मिळतील?
- महिलांनी योजनेत अर्ज भरलेला असावा.
- त्या महिला महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या असाव्यात.
- त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे.
- कुटुंबात ट्रॅक्टर सोडून दुसरी कार किंवा चारचाकी गाडी नसावी.
- त्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा फायदा घेत नसाव्यात.
- कुटुंबातील कोणीही आयकर (Tax) भरत नसावे.
- महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असावे.
काही महिलांना पैसे का मिळणार नाहीत?
सरकारने महिलांचे अर्ज तपासले. काही महिलांनी योजनेच्या नियमांचे पालन केले नाही. जसे:
- त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न जास्त आहे.
- त्यांच्या घरी कार आहे.
- कुटुंबातील कोणी Tax भरतो.
अशा 5 लाखांपेक्षा जास्त महिलांना आता या योजनेतून पैसे मिळणार नाहीत.
होळी साठी खास बोनस
यावर्षी होळी सणासाठी सरकारने बोनस दिला आहे.
ज्या महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता, त्यांना आता जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तिन्ही महिन्यांचे एकत्र पैसे मिळणार आहेत. म्हणजेच एकूण 4500 रुपये मिळतील.
तसेच, पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक महिलांना सरकारकडून मोफत साडी दिली जाणार आहे. ही साडी सरकारी रेशन दुकानातून मिळेल.